विमा कंपनी दावा नाकारते तेव्हा ..!
विमा कंपन्या अनेकदा वेगवेगळ्या कारणांवरून दावे नामंजूर करते.
(दावा म्हणजे क्लेम) विमा कंपनीने आपला
दावा फेटाळला असला तरी तो मिळवण्यासाठी आणखी काही पर्याय खुले आहेत का? अशावेळी
पॉलिसीधारक किंवा वारसदार हताश होतात आणि या विम्याचा दावा आपल्याला मिळू शकत नाही, असा विचार करत राहतात. पण निराश होण्याचे आणि
त्रास करून घेण्याचे कारण नाही यावर पण अनेक पर्याय खुले असतात फक्त आपण त्याचा अभ्यास
केला पाहिजे व माहिती घेतली पाहिजे.
1 एखादा दावा नामंजूर केल्यास पॉलिसीधारक आणि
वारसदार यांनी सर्वप्रथम विमा कंपनीच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज
करणे गरजेचे आहे. दावा फेटाळून लावणण्यामागचे कारण जाणून घेतले पाहिजे. यासाठी
अधिकार्याकडे लेखी तक्रार सादर करावी लागेल आणि माहिती मिळवावी लागेल. तक्रार
अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार आपले समाधान झाले तर ठिक आहे, अन्यथा दूसरा पर्याय
वापरावा
2. तक्रार निवारण अधिकारी च्या उत्तराने समाधानी
नसाल तर भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (इर्डा) कडे तक्रार नोंदवू शकता.
‘आयआरडीएआय’च्या कंझ्यूमर एज्यूकेशन संकेतस्थळावर किंवा इंटिग्रेटेड ग्रीव्हन्स
मॅनेजमेंट सिस्टिमवर तक्रार नोंदवू शकता. ‘इर्डा’च्या इंटिग्रेटेड ग्रीव्हेन्स
मॅनेजमेंट सिस्टिमच्या मदतीने तक्रारीचे सध्याची स्थिति देखील तपासू शकता.
3. पॉलिसीधारक विमा कंपनीच्या उत्तराने समाधानी
नसेल तर विमा लोकपालाकडे तक्रार करता येऊ शकते. ‘इर्डा’च्या कंझ्यूमर एज्यूकेशन
संकेतस्थळानुसार पॉलिसीधारकाच्या समस्या निकाली काढणे, निष्पक्षपणे चौकशी करून न्यायालयाबाहेर त्याचा
निपटारा करणे यासाठी विमा लोकपालची नियुक्त केलेली असते. सध्याच्या काळात देशात 17
विमा लोकपाल असून त्यांच्याकडे आपण विमा कंपनीविरुद्ध तक्रार नोंदवू शकता.
4 . अंतिम पर्याय म्हणजे ग्राहक
न्यायालय. आपण आपली तक्रार ग्राहक न्यायालयात दाखल करू शकता. फक्त 2 वर्षांच्या आत आपली तक्रार दाखल करावी लागेल.
पण आपण लिहिते झालात तरच आपली तक्रार निवारण होऊ शकते. एवढेच लक्षात ठेवावे
No comments:
Post a Comment