प्रॉपर्टी लोन एक पर्याय ...!
कर्ज तर घ्यायचय पण सिबिल स्कोर कमी असल्यास कर्ज
मिळण्यास अडचणी येतात. मग ते वैयक्तिक कर्ज असो किंवा कोणतेही कर्ज. बँका कमी
स्कोरच्या ग्राहकांना कर्ज देत नाहीत आणि दिल तर कमी देतात.अशा स्थितीत आपल्या
गरजेनुसार कर्ज मिळाले नाही तर गणीत बिघडू शकते. अशावेळी आपल्याकडे हक्काची
मालमत्ता असेल तर त्या बदल्यात गृहकर्ज किवा प्रॉपर्टी लोन मिळू
शकते.
प्रॉपर्टी लोन म्हणजेच मालमत्ता गहाण ठेऊन
घेण्यात येणारे कर्ज हे सुरक्षित कर्जप्रकारात मोडले जाते. त्यामुळे त्यावर आकरले
जाणारे व्याजदर हे परवडणारे असते. आपली मालमत्ता वित्तिय कंपनीकडे गहाण ठेऊन आपण
आथिॅक गरजा भागवू शकतो. कालांतराने कर्जाची परतफेड करुन मालमत्ता आपल्याकडे
सुरक्षितपणे राखू शकतो. कोणत्याही गोष्टींची गरज भागविण्यासाठी अशा प्रकारच्या
कर्जातून भागवता येणे शक्य आहे. कर्ज मिळवण्यासाठी निवासी आणि व्यापारी मालमत्तेचा
वापर केला जावू शकतो.
या कर्जासाठी आपल्या हक्काच्या मालमत्तेबरोबरच भाड्याने दिलेल्या
मालमत्तेचा देखील वापर करता येतो. हे कर्ज अधिकाधिक 15 वर्षासाठी
दिले जाते आणि त्याचा व्याजदर हा साधारणपणे तसा कमीच असतो. अशा प्रकारचे कर्ज
घेताना काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अर्ज करण्यापूर्वी आवश्यक
कागदपत्रांची तपासणी करावी लागते. रोख रक्कम आणि परतफेडीची क्षमता:
मालमत्तेच्या बदल्यात कर्जासाठी अर्ज करताना रोख रक्कमेची उपलब्धता आणि परतफेडीची
क्षमता याचे आकलन करावे. जर आपले उत्पन्न मासिक हप्त्याच्या क्षमतेपेक्षा कमी असेल
तर पहिल्या टप्प्यात आपला अर्ज फेटाळला जावू शकतो.
अचूक कर्जदात्याची निवड- लोन अगेस्ट प्रॉपर्टी (लॅप) मिळवण्यासाठी
कागदपत्रे आणि औपचारिकतेची पूर्तता करावी लागते. त्याचबरोबर अचूक कर्जदात्याची
निवड देखील महत्त्वाची आहे.मालमत्ता गहाण ठेवण्यापूर्वी बँकेची निवड करणे ही
महत्त्वाची प्रक्रिया आहे. ऑनलाइनवर अनेक बँकांचे पर्याय आपल्यासमोर येतात.
अशावेळी कमी व्याजदर आकारणारे आणि अधिक कर्ज देणार्या विश्वासू संस्थेची निवड
करणे हिताचे ठरते. साधारणपणे पंधरा वर्षासाठी कर्ज दिले जाते. कर्ज प्रक्रिया
शुल्क, व्याजदर, बँकांची तत्परता, अतिरिक्त
शुल्क याबाबतचे परिपूर्ण माहिती करायला
हवे. बँकेची निवड करताना कर्ज,
अटी आणि नियम यासारख्या निकषावर
पडताळणी करायला हवी.
कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी स्वत:चा सिबील स्कोर
तपासणे गरजेचे आहे. सीबिल कारण त्यातील चूका आपल्याला महागात पडू शकतात.
कर्जदाराने सिबिल स्कोर, अर्जाचे आकलन करताना क्रेडिट हिस्ट्री देखील तपासायला
हवी. क्रेडिट स्कोर कमी असल्यास तर बँका कर्ज देण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे
अशावेळी मालमत्ता गहाण ठेऊन कर्ज मिळवणे अधिक सोयीचे ठरु शकते. ऑनलाइन फायनान्शियल
मार्केट प्लेसेसच्या माध्यमातून मोफतपणे क्रेडिट रिपोर्ट मिळवू शकतो.
व्यावसायिक, व्यापारी वर्गाबरोबरच पगार घेनारी मंडळी देखील मालमत्तेवर कर्ज मिळवू शकतो. कोणत्याही बिगर वेतनदार वर्गाच्या प्राप्तीकराचे आकलन करण्यासाठी आणखी काही कागदपत्रांची गरज असते. यात ऑडिट रिपोर्ट, दोन तीन वर्षाचे रिटर्न, केवायसी कागदपत्रे, बँकांचे स्टेटमेंट, आदीची गरज असते. याशिवाय मालमत्तेची कायदेशीर कागदपत्रे असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यानुसार अर्जदाराला मालकी हक्काचा पुरावा देता येईल.
शेवटी एकाच सांगतो प्रॉपर्टी लोन म्हणजे आपली हक्काची प्रोपार्ती कोणाच्या तरी ताब्यात देत आहोत हे लक्षात ठेवावे. कोणतेही कर्ज घेताना अतिशय सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कर्जाची गरज महत्वाची आहे आणि गरज असेल तरच कर्ज घेणे महत्वाचे आहे.
No comments:
Post a Comment