Saturday, 10 August 2024

सावधान : न दिसणारा चोर

 


ग्राहक प्रबोधन

 

  • तुमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर ‘तुम्ही फक्त आमचा युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्हाला घरबसल्या पैसे मिळतील.’ असा मेसेज आला असेल तर सावधान. कारण असेच मेसेज करून,तुमच्या बँक खात्यांमध्ये सुरुवातीला काही पैसे टाकून नंतर खात्यातील सर्वच पैसे काढून नंतर खात्यातील सर्वच पैसे काढून घेणारी सायबर भामटे  नवा पॅटर्न राबवत आहेत.
  •  अनेकजणांना असाच लाईक, सबस्क्राईबचा मेसेज येत असून ते संबंधित भामट्यांच्या अमिषाला बळी पडत आहेत.दिवसाला अवघे तीन युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून त्यातून दोन हजार ते १० हजार रुपये दिवसाला कमविण्याचे आमिष हे सायबर भामटे दाखवित आहेत. काम वेळेत पूर्ण केले म्हणून रिवॉर्डदेखील देत आहेत. 
  • एका महिलेच्या बँक खात्यामध्ये हे काम करत आहे म्हणून तिच्या बँक खात्यात सलग आठ दिवसांत दोन हजार रुपये जमा केले. त्यानंतर महिलेला एक लिंक पाठवून त्यावर आमचे खाते ओपन करण्यास सांगून त्यावर तिचे पैसे जमा होतील असे सांगण्यात आले. महिलेच्या त्या खात्यावर सुरुवातीला काही पैसे जमा झाले. मात्र, महिलेने ज्या लिंकद्वारे ही माहिती भरली त्याद्वारे महिलेच्या बँकेचे ऑनलाईन पासवर्ड तसेच बँक खाते हँडल करण्याचा अॅक्सेस मिळाला. त्याद्वारे चोरट्याने बँक खात्यातील सर्व पैसे काढून घेतले.
  • हा फ्रॉडचा प्रकार आहे. एकानंतर एक काम सांगून त्यामध्ये संबंधित व्यक्तीला गुंतवणूक करण्यास सांगून लूट केली जाते. त्यामुळे व्हॉट्सअॅप अथवा टेलिग्रामद्वारे मिळणा-या अशा स्वरूपाच्या कामांवर, मेसेजवर विश्वास ठेवू नका. अनोळखी व्यक्तींकडून संपर्क साधला जात असेल तर वेळीच सावध व्हा.
  • अशी घ्या काळजी .....
  •     अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजला रिप्लाय करू नका.
  • •    घरबसल्या फक्त लाईक, सबस्क्राईब करून पैसे मिळत नसतात त्यामुळे अशा मेसेजकडे दुर्लक्ष करा.
  •     अनोळखी नंबर किंवा एसएमएस करणा-याला बँक डिटेल्स देऊ नका.
  • •    कमी वेळेत जस्त पैशाचे आमिष दाखवत असतील तर प्रश्न उपस्थित करा.
  •     माहिती भरण्यासाठी पाठवलेल्या लिंक सुरक्षित आहे का याचा विचार करून पुढचे पाऊल उचला.
  •     आवश्यकता नसताना पाठवलेली लिंक क्लिक करू नका. त्यामुळे तुमच्या अकाऊंटची माहिती सायबर भामट्यांबरोबर शेअर होऊ शकते. गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडू नका.

No comments:

Post a Comment

असाही एक व्हाटसप्प ग्रुप

  ग्राहक चळवळीला मार्गदर्शक " खटाव तालुका ग्राहक संरक्षण समिती " व्हाट्सऍप ग्रुप.                                              ...