विमा
मोफातही असतो ...!
प्रत्येक
व्यक्तीने भविष्यातील आर्थिक सुरक्षा पाहता किमान एक जीवन विमा पॉलिसी खरेदी
करायला हवी. पॉलिसी खरेदी करण्याबाबत आपण गंभीर नसाल तर काळजी करण्याचे कारण नाही.
कारण काही विमा पॉलिसी अशाही असतात की, त्या
वस्तू आणि सेवा खरेदी केल्यानंतर आपोआप मिळतात आणि त्याच्यासाठी विमाधारक व्यक्तीला
वेगळे पैसे द्यावे लागत नाहीत. या
प्रकारच्या पॉलिसीला काहीजण हिडन इन्शूरन्स असेही म्हणतात. यासंदर्भात अनेकांना
फारशी माहिती नाही. परंतु या पॉलिसी अतिशय उपयुक्त असतात.
हिडन
इन्शूरन्स म्हणजे काय?
शब्दातूनच
आपल्याला कळेल की हिडन म्हणजे दडलेला. या लपलेल्या विम्याचा हप्ता हा एखादी वस्तू
किंवा सेवेच्या मूल्यांत लपलेली असते. प्रत्यक्षात अशा प्रकारच्या विमा
कवचसंदर्भात सर्वसामान्य व्यक्तींना फार कमी माहिती असते. प्रत्येक व्यक्ती
धावपळीत एवढा व्यस्त असतो की आपल्याला मोफत विमा मिळतो, हे माहीतच नसते. उदा. एअर तिकीट, ट्रेन तिकीट, एटीएम कार्ड, बँक अकाऊंट आदी. यासारखे अनेक उत्पादने
आणि सेवा असून त्या खरेदीवर जीवन विमा मोफतपणे मिळतो. एखादा व्यक्ती अशा प्रकारची
सेवा आणि उत्पादने घेत असेल तर त्याने लपलेल्या विम्याबाबत माहिती घेणे अत्यंत
महत्त्वाचे आहे.
* घरगुती उपकरणांच्या खरेदीवर विमा कवच: एखादि व्यक्ती टिव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि अन्य टिकाऊ वस्तू खरेदी करत असेल तर त्यावर निर्यात
कंपनी ग्राहकाला त्या वस्तूच्या आधारे विमा कवच प्रदान करते. परंतु यासंदर्भातील
माहिती फार कमी लोकांना असते. अशा प्रकारचे विमा कवच हे सामान्यपणे उत्सवाच्या
काळात प्रदान केले जाते. अर्थात त्यासाठी जादा हप्ता घेतला जात नाही, परंतु विम्याचा खर्च हा वस्तूच्या
किंमतीत सामील केला जातो. याप्रमाणे विमा हा गॅरंटी आणि वॉरंटीशिवाय असतो.
* गॅस सिलिंडरवर जोखीम कवच : घरगुती गॅस सिलिंडर सेवा देणार्या
कंपन्या देखील नोंदणीकृत ग्राहकांना गॅसमुळे हेाणार्या दुर्घटनेपासून होणार्या
आर्थिक आणि मानवी नुकसानीला संरक्षण देण्यासाठी विमा कवच प्रदान करते. या विम्याबाबत
फारशी माहिती लोकांना नसते आणि लहान सहान दुर्घटनेसंदर्भातील माहिती देखील कंपनी
किंवा वितरकांना सांगितली जात नाही. याप्रकारच्या विम्यात कमाल 40 लाखांपर्यंत विमा कवच प्रदान केले जाते.
* स्मार्टफोन कवर : स्मार्टफोन तयार करणार्या कंपन्या
विक्री वाढविण्यासाठी ग्राहकांना स्मार्टफोनच्या खरेदीवर फोनचा विमा मोफतपणे
उपलब्ध करून देत आहेत. फोन चोरी गेल्यास, हरविल्यास
किंवा तुटल्यास स्मार्टफोन कंपनी मोफतपणे फोन रिप्लेस करते किंवा दुरुस्त करते.
* प्रवासाची जोखीम : प्रत्येक प्रवाशाला बस, रेल्वे, विमान प्रवासात विमा कवच असते. सामान गहाळ झाल्यास, आंशिक किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास, आर्थिक नुकसान झाल्यास विमा कवचच्या
रुपातून भरपाई दिली जाते. बस, रेल्वे, हवाई प्रवासातील विम्याचा हप्ता हा
खूपच कमी असतो. बससाठी वेगवेगळ्या राज्यांत विमा कवचची रक्कम ही वेगळी असते. काही
राज्यात बस प्रवाशांना दोन लाख रुपयांचा मोफत जीवना विमा मिळतो तर काही राज्यांता
पाच लाख, दहा लाखांपर्यंत सुरक्षा कवच असते.
रेल्वे प्रवाशाना देखील विमा कवच असते. रेल्वे तिकीटाचे ऑनलाइन बुकींग करताना
त्याचा विम्याचा हप्ता हा खूपच किरकोळ रुपात वसूल केला जातो. याप्रमाणे हवाई
प्रवासात घरगुती प्रवासात 50 लाख रुपये तर आंतरराष्ट्रीय प्रवासात
एक कोटींपर्यंत विमा कवच दिला जातो. या हप्त्याची रक्कम ही तिकीटात सामील केलेली
असते.
* बँकेतील जमा रक्कमेचा विमा : देशातील सर्व बँका आपल्या ग्राहकांना
खात्यात जमा असलेल्या रक्कमेवर आणि मुदत ठेवीवर मोफत विमा देते. बँकेकडून एखादी
सेवा स्थगित केली जाते किंवा बँक बंद होत असेल तर खातेधारक जमा रक्कम ही व्याजासकट
मिळवण्यासाठी दावा करू शकतो. एखादी बँक बंद पडली असेल आणि त्या व्यक्तीचे बँकेत
पाच लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम असेल तर त्याची संपूर्ण रक्कम ही या विम्या
योजनेनुसार मिळते. पण त्याचे पाच लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम बँकेत असेल तर
त्याला पाच लाखांपर्यंतच विमा कवच मिळेल.
अधिक माहितीसाठी आपल्या बँकेत संपर्क साधा
No comments:
Post a Comment