सूत्रसंचालन कसे असावे
-श्री अजित
वाराणशीवार,पुणे
सूत्रसंचालन करताना आपले सूत्रसंचालन / निवेदन ओघवते, प्रभावी व्हावे
यासाठी निवेदकाने काही पथ्ये पाळायची असतात. त्सेक, निवेदकाच्या काही जबाबद-याही
असतात. सूत्रसंचालन करत असताना त्यात काय असावे आणि काय टाळावे याचाही विचार
केलेला असावा. या सगळ्याची सविस्तर माहिती आपल्याला अजितसरांच्या केलेल्या रसाळ, ओघवत्या चर्चासत्रात ऐकायला
मिळाली आहे. त्यांच्या ग्राहकराजा व्याख्यानातील काही महत्त्वाचे मुद्दे इथे
संक्षिप्त स्वरुपात मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न !
सर्वात प्रथम आपण बघूया की सूत्रसंचालक /
निवेदक कसा असावा? कारण कार्यक्रमाचा सर्व डॉलर हा निवेद्कावारच अवलंबून असतो. कार्यक्रमाची
रंगत वाढवत नेऊन, श्रोत्यांना गुंतवून ठेवून त्या कार्यक्रमाचा दर्जा उंचावणे हे
पूर्णत: निवेदकाच्या हातात असते. त्यामुळे निवेदकाच्या अंगी नेमके कोणते गुण
असावेत; तर ते खालीलप्रमाणे असावेत.
निवेदक
कसा असावा :
१. निवेदकाची देहबोली.
२. निवेदक ‘प्लस्टिक मोल्ड’ सारखा असावा.
३. निवेदक काचेसारखा पारदर्शी असावा
४. सर्व जात, धर्म, भाषा, प्रांत यांचा आदर
करणारा असावा.
५. दुस-याच्या विचारांचा आदर करणारा असावा.
थोडक्यात,
निवेदक प्रसन्न, हस-या चेहे-याचा असावा. त्याने सूत्रसंचालन करताना खूप हातवारे
करणे किंवा अगदी मख्ख, स्तब्ध उभे राहून निवेदन करणे टाळले पाहिजे. निवेदकाची नर
चौफेर फिरत असावी. त्यामुळे श्रोत्यांना निवेदक आपल्याकडे बघतो आहे, आपल्याशी
बोलतो आहे असे वाटते. त्यामुळे निवेदकाशी त्यांची नाळ पटकन जुळली जाते. हेच
कार्यक्रम यशस्वी होण्याचे एक चिन्ह आहे. निवेदक हा ‘प्लस्टिक मोल्ड’ सारखा असावा
म्हणजेच कार्यक्रमाच्या वेळी सूत्रसंचालनात हवं तसा बदल त्याला करता येणे आवश्यक
आहे. आपल्या निवेदनाला त्याने स्थल-काल-प्रसंगानुरूप वेगवेगळे आकार देणे आवश्यक
आहे. त्याचप्रमाणे तो काचेसारखा ‘पारदर्शी’ असावा. त्याने कोणताही पूर्वग्रह मनांत
धरून निवेदन करू नये. ‘स्व’ मताला प्राधान्य देऊन तेच कसे बरोबर आहे असे
दाखवण्याचा प्रयत्न करु नये. ट सर्व धर्म, जाती, भाषा, प्रांत यांचा आदर करणारा
असावा. कोणत्या एका घटकाला धरून त्याचेच समर्थन करीत अथवा त्याव्यतिरिक्त इतर
घटकांवर अन्याय, त्याचा अपमान करीत निवेदन करणारा नसावा. ‘स्व’ मताबरोबरच त्याने
दुस-यांच्या मताचाही आदर करणे अत्यंत आवश्यक आहे.
आत्ता आपण बघितले की निवेदक कसा असावा. आता
आपण बघूया की सूत्रसंचालन कसे असावे. सूत्रसंचालनात काय असावे आणि काय असू नये.
सूत्रसंचालनकसे
असावे :
|
सूत्रसंचालनात
काय असावे |
सूत्रसंचालनात
काय नसावे |
१ |
निवेदन
सचित्र आसवे |
वेदनादायी
निवेदन नसावे |
२ |
सूत्रसंचालनाची
मांडणी सोप्या पद्धतीची असावी |
पांचटपणा
नसावा |
३ |
व्यक्तीला
मोठे करण्याचा प्रयत्न असावा. |
कोणत्याही
व्यंगावर भाष्य नसावे |
४ |
|
थोरांच्या
विचारांवर भाष्य नसावे |
५ |
|
पाल्हाळ
नसावे, रटाळ नसावे |
या वरून आपल्याला असे लक्षात येते की,
सूत्रसंचालन सचित्र असावे. म्हणजेच, निवेदक निवेदन करत असतांना श्रोत्यांच्या
डोळ्यासमोर तो प्रसंग, ते स्थळ उभे राहिले पाहिजे. एवढे प्रभावी निवेदन करण्याची
ताकद निवेदकात असणे गरजेचे आहे. अतिशय सोप्या शब्दांत, ओघवत्या वाणीत कार्यक्रमाची
रूपरेषा लक्षात घेऊन सूत्रसंचालनाची मांडणी करणे आवश्यक आहे. याबरोबरच निवेदक
आपल्या निवेदनात ‘स्व’ मताला प्राधान्य देऊन आत्मप्रौढी तर बजावत नाहीये ना किंवा संयोजकांपेक्षा (कार्यक्रम ज्यांचा असेल त्यांच्या पेक्षा)
पाहुण्यांनाच अतिम्हत्त्व दिले जात नाहीये ना, त्यांचाच उदोउदो होत नाहिये ना
याकडे बारकाईने लक्ष असणे व या गोष्टी कटाक्षाने टाळणे अत्यावश्यक असते. निवेदकाने
आपल्या निवेदनातून कार्यक्रम ज्या संस्थेचा, व्यक्तीचा असेल तिला मोठे करणे आवश्य
असते.
सूत्रसंचालन करतांना निवेदन हे वेदनादायी
नको. खूप खोचक बोलणे वा कुणाच्यातरी शारिरीक व्यंगावर टीका करणे, पांचट विनोद करणे
या गोष्टी टाळायला हव्यात. थोर व्यक्तींच्या विचारांवर निवेदकाने ‘स्व’ मतांचे
प्रदर्शन करणे टाळले पाहिजे.
सूत्रसंचालनाची
पथ्ये :
१. 1 भाषा वाणी, २. श्रोत्यांना गृहीत धरु नये ३. दुस-यांच्या विचारांचा आदर
4 ४. एकेरी उल्लेख नकरता आदरयुक्त उल्लेख असावा
निवेदकाचा अक्षरांचा उच्चार स्पष्ट असावा. ‘श’, ‘ष, ‘स’, ‘न’, ‘ल’,
‘ळ’ यासारख्या अक्षरांचे उच्चार स्पष्ट असावेत. शब्दांची निवड, मांडणी ही सोपी
असावी. फार अवघड, अवजड शब्द न वापरता सोप्या परंतु चपखल शब्दांची निवड करावी. निवेदन
करतांना खूप मोठी, लांबलचक वाक्यरचना न करता छोटी छोटी वाक्य असावीत. शैलीदार
वाक्यरचना हे निवेदनाचे खूप प्रभावी मध्यम आहे. परंतु जसे आपण सण - समारंभालाच
दागिने घालतो त्याचप्रमाणे आवश्यक तेथेच शैलीदार वाक्यरचना असावी. निवेदकाची वाणी
ही मधुर, रसाळ व विनम्र असावी. अजितसरांनी सांगितल्याप्रमाणे ती ‘गुळगुळीत
रस्त्या’ प्रमाणे असावी म्हणजेच ओघवती, सहज, सोपी असावी. कोणत्या शब्दावर किती
जोर, वजन द्यायचे याचे ज्ञान निवेदकाला असावे. ‘मधाळ’ वाणीमुळे आपले निवेदन ‘रटाळ’
होत नाहीये ना याचे भान निवेदकाला असावे. निवेदन करतांना निवेदकाने श्रोत्यांना
अजिबात गृहीत धरू नये. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीसंदर्भात बोलतांना एकेरी
उल्लेख न करता आदरयुक्त उल्लेख करावा.
सूत्रसंचालकाच्या
जबाबद-या :
१. 1 अभ्यासपूर्ण निवेदन असावे, २. वेळेत कार्यक्रम संपविणे ३. परिस्थितीचे भान
4 ४. विशेषणांचा वापर ५. संयोजक किंवा नियोजकाने सांगितल्याशिवाय काहीही ‘Add’ करू नये
सूत्रसंचालनाच्या आधी निवेदकाने संयोजक अथवा नियोजकांकडून पुरेसा अवधी
मागून घेऊन त्या कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा, संस्था / व्यक्तीसंदर्भातील
संपूर्ण माहिती समजावून घेणे, कोणकोणते मान्यवर, अतिथी येणार आहेत, कोणाच्या हस्ते
दीप प्रज्ज्वलन होणार आहे, कोणाचे व कोणाच्या हस्ते सत्कार होणार आहेत, आयत्यावेळी
एखादी व्यक्ती आली नाही, एखादं गाणं रद्द अथवा ठरलेल्यापेक्षा वेगळं म्हणण्याची
वेळ आली तर तसे करायचे का? तो कार्यक्रम करण्यामागचा विचार, भावना काय आहेत हे
लक्षात घेऊन त्याचा पूर्ण अभ्यास करून स्वत:च्या हस्ताक्षरातील टिपणी काढून मग
कार्यक्रमासाठी सज्ज व्हावे.
एखादा कार्यक्रम लांबत असेल तर तो कोणालाही न दुखावता वेळेत कसा पूर्ण
करता येईल यासाठीची समयसूचकता व अनुभव निवेदकाकडे असणे आवश्यक आहे. एखादा कार्यक्रम
खूपच कंटाळवाणा होत असेल तर त्यात खुमारी कशी आणता येईल, त्यासाठी कशाप्रकारे
निवेदन करणे आवश्यक आहे यासाठीची समयसूचकता निवेदकाकडे असणे आवश्यक आहे. निवेदनामध्ये
विषयाची मांडणी करतांना कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी प्रसंगानुरूप किस्से,
कविता, चुटकुले, सुभाषिते, चारोळ्या यांची योग्य तिथे व योग्य प्रमाणात पेरणी
करावी. आपले किस्से, कविता, चुटकुले यामुळे कार्यक्रमात समाविष्ट असलेल्या
गोष्टींमधील (गाणी, काव्य) गोडवा हरवेल असे निवेदन करू नये. अजितसरांनी वर्णन
केल्याप्रमाणे ‘दोन गावांना जोडणारा पूल’ जसे काम करतो तसेच काम निवेदकाने करणे आवश्य
आहे. नेमके, योग्य, अचूक निवेदन करून कार्यक्रम पुढे नेण्यातच निवेदकाचे कौशल्य
असते.
निवेदन करतांना आदरणीय, पूजनीय, परमपूज्य, ऋषीतुल्य अशा विशेषणांचा
वापर करतांना काळजीपूर्वक करावा. एखद्या ठिकाणी निवेदकापेक्षा लहान परंतु समाजातील
त्या व्यक्तीचा अधिकार खूप मोठा असेल तर अशी व्यक्ती असल्यास त्या व्यक्तीला योग्य
सन्मान देणे निवेदकाचे कर्तव्य आहे.
जोपर्यंत संयोजक अथवा नियोजक येऊन ‘अमुक असे करा’ किंवा यांचा उल्लेख
करा असे सांगत नाहीत तोपर्यंत निवेदकाने आपल्या मनाने निवेदनामध्ये काहीही ‘Add’ करू नये. शेवटचे पण
सगळ्यात महत्त्वाचे निवेदक हा मधमाशी सारखा असावा. मधाळ वाणी बरोबरच गरज पडल्यास
कोणालाही न दुखावता, कार्यक्रमाची रंगत कमी होऊ न देता स्पष्टपणे विचार मांडणारा व
तरीही श्रोत्यांना गुंतवून ठेवणारा असावा. कारण यातच निवेदकाचे कौशल्य दिसून येते.
No comments:
Post a Comment