संघटना वाचलीच पाहिजेत
सर्वसाधारणपणे भारत देशामध्ये अनेक संघटना, संस्था कार्य करत असतात. संघटना
संघटनांमध्ये फरक असतो. काही वेळेला असं असतं एखादी मातृ संघटना असते व त्या
संघटनेला कुठेतरी विरोध करण्यासाठी दुसरी संघटना उभी केली जाते. त्यांच्यामधला द्वेष
वाढत जातो. मात्र मातृसंघटना वाढते हे पाहवत नाही म्हणून दुसरी संघटना उभी
राहिलेली असते. त्या संघटनेतून एखाद पिल्लू म्हणून सोडलं जातं. आणि त्याच्या
मार्फत मात्र संघटनेला धोका कसा होईल? भविष्यात
मातृ संघटनाच कशी बंद पडेल?
यालाच लक्ष केले जाते.
पुढे काय होतं, तो द्वेष हा वाढत जातो. आणि या
द्वेषातून एकच लक्ष्य डोळ्यासमोर असते की मातृ संघटना संपवणे. कदाचित याची काहींनी
सुपारी जणू घेतलेली असते आणि मग जे काही घडतं ते वेगळंच.पण आपल्याला आपली संघटना
टिकवायची असेल, आपली संस्था टिकवायची असेल तर आपण
सावधगिरीने पावले उचलावीत. मातृ संघटनेच्या तत्वाला धोका पोचणार नाही हे पाहिलं
पाहिजे हेच मला या लेखातून सांगायचे आहे.कारण सध्या अशी मनमानी बर्याच ठिकाणी चालू
आहे.
बंधूंनो म्हणजे कस होत ते थोडसं स्पष्टीकरण करतो. एखादी संघटना किंवा
संस्था असते. या संघटनेला पॅरेलल म्हणून दुसरी संघटना उभी केली जाते. आणि मातृ
संघटना वाढूच नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. म्हणजेच नेमकं काय घडत? तर बघा दुसऱ्या संघटनेतून मूळ
संघटनेमध्ये एखादा माणूस पाठवला जातो. त्याला बळ दिलं जातं, आर्थिक पाठबळ पण दिलं जातं. त्याला
वरपर्यंत चढवल जात. त्याला पाहिजे ती पद दिली जातात. हे सगळे करायचे काम या उप
संघटनेकडून अप्रत्यक्षरीत्या होत असतं. आणि यामागचा उद्देश काय तर मातृसंघटना संपवणे हे व्रतच जणू त्यांनी घेतलेले
असते.माझ्या भाषेत सुपारी घेतली म्हटल तर वावग ठरणार नाही.
काही संघटनांमध्ये या संघटनेचे लोक पाठवले जातात. ते यामुळेच संघटनेत
वरिष्ठांचा किंवा अन्य काही लोकांचा विश्वास संपादन करून एखाद्या मोठ्या चांगल्या
पदावर बसतात. त्या पदावर बसल्यानंतर सुरुवातच अशी होते की यामुळे मूळ संघटनेत
असलेली व ज्यांनी तत्त्व सांभाळलेली आहे, त्यांच्याकडे
तत्व आहेत अशा लोकांनाच आगोदर दूर केलं जात. म्हणजे काम करायला मार्ग मोकळा होतो. आता एकदा का ही
लोक मूळ संघटनेतून दूर गेले म्हटली की सगळी संघटना आपल्या ताब्यात आली. असं त्या
व्यक्तीला वाटत असतं. पण पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची या परिस्थितीप्रमाणे
अवस्था झालेली असते. हे त्याच्या लक्षात येत नाही. पुढे आलेली व्यक्ती या मूळ
संघटनेमध्ये महत्वाच्या पदावर सगळा ताबा घेता आला पाहिजे अशी माणसे उभी करते. स्वतःच्या
कानाला लागतील अशी माणसे उभी करते. थोडक्यात काय तर चाड्या लावणाऱ्या माणसांना
स्थान दिले जात. मग तिकडे संघटनेचे काहीही होवो.
काही कालांतरानंतर या संघटने मध्ये कोण काय करते, कोण काय करते? या सगळ्याचा अभ्यास केला जातो. आणि
बरोबर आपल्याला डोईजड होतील अशी तत्त्वनिष्ठ माणस ओळखून त्यांना वेळोवेळी नाराज कसं
करता येईल ? बाजूला कसे सरकवता येईल हे पाहिले जाते. याचा परिपूर्ण अभ्यास केला
जातो. वेळोवेळी बाजूला कसे ठेवता येईल याचाच विचार या संघटनेत आलेल्या लोकांनी
केलेला असतो. काही कालावधीनंतर काय होतं आपोआपच जुनी माणस संघटनेमध्ये दुखावली
जातात. आणि त्या ठिकाणी आपला माणूस कसा बसेल याचाच विचार केला जातो ? एवढंच नाही तर त्या संघटनेमध्ये असणारे
पदाधिकारी हे बहुतांशी आपले कसे असतील ? आपल्या
हातातलं खेळणं कसे असतील ?
आपण सांगू ती ऐकणारे कसे असतील ? याचा परिपूर्ण अभ्यास करून अशीच माणसं
त्या ठिकाणी बसवली जातात. हे वास्तव आहे.
मग
पुढे काय होतं तर अशा नाराज झालेल्या लोकांमुळे संघटना कमजोर होते. भविष्यामध्ये
कुठल्याही क्षणी हे लोक दुसऱ्या संघटनेमध्ये जातात. तिथे स्वतःचे स्थान बळकट करतात, स्वतःच्या खुंटा बळकट करतात. आणि तिथेच रहाणं पसंत करतात.मात्र
तत्वाशी एकनिष्ठ असलेले शांतच राहण्याच पसंत करतात.
तात्पर्य काय तर संस्था,संघटनेत बाहेरच्या संघटनेतून येऊन आपल्या डोक्यावर
बसणारी माणसं वेळीच ओळखली पाहिजेत. अनेक संघटनांमधून, संस्था मधून आलेला अनुभव आहे. अनेक संघटनांचा केलेला अभ्यास आहे. यातून
हे लिखाण केले आहे. दुर्दैवाने हे जर कोणाच्या बाबतीत खरं घडत असेल तर तो अपघात
समजावा.
पण बांधवांनो एवढच सांगतो आपली संघटना,संस्था सांभाळा. याच्यामध्ये बाहेरून आलेला आपल्यावर कोणी राज्य करत तर नाही ना? नाही तर व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. अशी याआधी भारताची जी अवस्था झाली तीच अवस्था भविष्यात होणार आहे. आपल्यातून आपले मूळतत्व मोडकळीस आणून, आपल्या तत्त्वांना तिलांजली देऊन, दुसऱ्यासाठी व दुसर्याच्या जीवावर संघटना मोठे करण्याचा प्रयत्न करणारे सुपारी किलर वेळीच ओळखा एवढंच माझं म्हणणं आहे.काही झाल तरी आपली संघटना,संस्था वाचलीच पाहिजे
No comments:
Post a Comment