अभ्यासवर्गात संघटनेचे महत्त्व
हा विषय धनंजयराव गायकवाड यांनी मांडला होता
‘संघटना’.... आपण बघतो की, आपल्या आजूबाजूला
विविध क्षेत्रातील, विविध ध्येय, उद्दिष्टे
असणा-या अनेक संस्था, संघटना काम करत
असतात.
पूर्वी अगदी कौटिल्य पासून विचार केला तर
पुढे बिंदुमाधव जोशी यांनी ग्राहक पंचायत ही संघटना उभारून ‘शोषणमुक्त समाज’ हे
ध्येय ठेऊन मोठी चळवळ सुरु केली. त्यांनी यामध्ये असंख्य कार्यकर्ते जोडले व
संघटना मजबूत बनवली. याचा परिणाम असं झाला की, सरकार दरबारी ३०-३२ कलमी कायदा
मंजूर करणे शासकीय यंत्रणेला भाग पडले. कारण इथे संघटनेचा सांघिक रेटा होता.
एखाद्या व्यक्तीने एखादी वस्तू खरेदी केली
पण ती चांगली निघाली नाही तर त्या व्यक्तीला त्याविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार
आहे. परंतु बरेचदा असे दिसून येते की, ती व्यक्ती खूप प्रयत्न करून देखील अपयशी
ठरते. परंतु हीच व्यक्ती जत ग्राहक पंचायती मध्ये आपली तक्रार घेऊन आली तर टा
निश्चितच त्याचा फायदा होऊ शकतो. कारण एक तर तिला तिथे योग्य मार्गदर्शन मिळते,
आणि एका व्यक्तीपेक्षा संघटनेचा आवाज यात खूप फरक पडतो. संघटनेकडून जर दाद मागितली
जात असेल तर नक्कीच विचारपूर्वक हालचाली केल्या जातात. म्हणजेच थोडक्यात संघटन
असेल तर त्यात सरकारी यंत्रणेला
झुकविण्याचे सामर्थ्य असते.
“अद्वितीय” म्हणजे एकासारखा दुसरा नाही.
याचा फायदा संघटनांनी करून घ्यायला हवं. या भूतलावर प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी
आहे. प्रत्येकाकडे काही गुण-दोष आहेत, प्रत्येकाकडे काही न काही स्वभाववैशिष्ट्ये
आहेत. याचा फायदा घेऊन संघटकाने कोणती व्यक्ती कुशल कार्यकर्ता होऊ शकते हे हेरले
पाहिजे किंवा प्रत्येक व्यक्ती संघटनेचा कार्यकर्ता कशी बनू शकेल?, त्यासाठी
त्याला कोणत्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे? याचे बारकाईने निरीक्षण केल्यास
संघटनेला मोठया प्रमाणात ‘कुशल कार्यकर्ता’ मिळू शकेल.
आपण या भूतलावर जन्म घेतला आहे तर त्या
जन्माचे काहीतरी चांगले कार्य करून सार्थक केले पाहिजे. संघटनेचे सबलीकरण कसे होईल
याकडे लक्ष दिले पाहिजे. व्यापक संघटनासाठी मुळात ग्राहक डोळा विकसित करणे गरजेचे
आहे. यासाठी संघटनेचे कार्य, तिची उद्दिष्टे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी
पोहोचतील यासाठी कृतीशील कार्यक्रम राबवले पाहिजेत. जेणेकरुन सामान्य नागरिकांना
संघटनेची माहिती होईल व ते त्यांच्या तक्रार निवारणासाठी किंवा इतर कही मदत
घेण्यासाठी ते संघटनेकडे येतील.
यासाठी सगळ्यात आधी ग्राहकांचे ‘संघटन’ होणे
आवश्यक आहे. आपल्याकडे ग्राहकांचे संघटन का नाही याचे एक कारण प्रकर्षाने जाणवते
की, आज प्रत्येकजण ‘मला काय त्याचे’ किंवा
‘मला काय करायचंय’ हाच दृष्टीकोन मनाशी बाळगून जगतो आहे. आपल्या ओळखीत,
शेजारीपाजारी कोणाची फसवणूक झाली असेल तर ते फक्त ऐकून घेऊन ‘जाऊ दे मला काही
त्याचा त्रास नाही ना मग मि कशाला त्यात लक्ष घालू, मला काय करायचंय’ असा विचार
करून बाजूला होणारे असख्य जण आपल्या आजूबाजूला पदोपदी दिसतात पण अशी वेळ स्वत:वर
आली की हवालदिल होतात.
परंतु, यातून फसवणूक झालेला व फसवणूक न
झालेला कोणीच हा विचार करत नाही की माझी फसवणूक झाली तशी बाकीच्यांची होऊ नये
म्हणून न घाबरता, मनात संकोच न बाळगता, खुलेपणाने फसवणूक होऊ नये व झाली तर
कोणाची, काय मदत घ्यायची ही माहिती इतरांना दिली पाहिजे. उलटपक्षी ज्याची फसवणूक
झालेली नाही त्यानेदेखील समोरच्याकडून (ज्याची फसवणूक झाली आहे त्याच्याकडून)
डोळसपणे माहिती घेतली पाहिजे, त्याला त्याच्या अडचणीतून बाहेर येण्यासाठी मदतीचा
हात पुढे केला पहिजे.
यासाठीच ग्राहकांचं प्रबोधन करणे, त्यांना
प्रशिक्षण देणे, कोणत्या तक्रारीसाठी कोणाकडे मदत मागायची याचे ज्ञान करून दिले
पाहिजे. कारण तेल, तूप, डाळी एवढ्यापुरतच हे मर्यादीत नसून ऑनलाईन फसवणूक देखील
(सायबर क्राईम) मोठया प्रमाणात वाढत आहे. कित्येकदा बँकेमधून पैसे चोरीला
गेल्याच्या घटना आपण ऐकतो. मग अशा परिस्थितीत हातपाय गाळून न बसता काय पाऊले उचलली
गेली पाहिजेत यासाठी उलट ग्राहक जागरूक पाहिजे. त्याचे प्रबोधन / प्रशिक्षण झालेले
असले पाहिजे. तर तो योग्य मार्गाने, योग्य ठिकाणी जाऊन दाद मागू शकेल.
या सगळ्यासाठी मुळात ‘संघटन’ मजबूत असणे
गरजेचे आहे. त्यात ‘संघटनांचे संघटन’ व ‘ग्राहकांचे संघटन’ या दोन्हीचा विचार
करावा लागेल.
आपण वर बघितले की, एकट्या-दुकट्याने
ग्राहकाची फसगत झाली तर काय काय करावे पण याचप्रकारे एकाच वेळी अनेकांची (सामुहिक)
फसगत झाली सेल तर अशा सर्व ग्राहकांनी एकत्र येऊन, संघटित होऊन अन्यायाविरुद्ध दाद
मागितली तर अशा संघटित ग्राहकांचा आवाज, त्यांचा रेटा याचा सरकारी यंत्रणांवर
निश्चितच मोठया प्रमाणावर दबाव निर्माण होतो व त्या ग्राहकांना न्याय मिळण्यामध्ये
याचा खूप फायदा होऊ शकतो. यासाठी ग्राहकांचे ‘संघटन’ होणे महत्त्वाचे आहे.
तसेच संघटनांमधील संघटनही खूपच महत्त्वाचे
असते. एखाद्या संघटनेत कार्यकर्त्यांमध्येच विसंवाद असेल, कार्यकर्ताच जर
निरुत्साही असेल, त्याचे संभाषण कौशल्य, चिकित्सक, अभ्यासू वृत्ती नसेल, काम
करण्याची तळमळ नसेल तर तो इतर सहकार्यांनादेखील जोडला जाणार नाही. याचा दुष्परिणाम
मात्र संघटनेचवर होईल. संघटनेचे कार्य सुरळीत चालू राहणार नाही, तिचे उद्दिष्ट,
ध्येय साध्य होणार नाही. ‘संघटने’ ची प्रतिमा मलीन होईल. हे सर्व रोखायचे असेल तर
संघटक, पदाधिकारी ते संघटनेचा लहानात लहान कार्यकर्ता यांच्यामध्ये समन्वय असणे,
एकमेकांबद्दल मनात आकस नसणे, परस्परांच्या अडचणी, मर्यादा समजून घेऊन योग्य्योग्य
ते मार्गदर्शन करणे, सल्ला देणे, मदत करणे यातून परस्परसंबंध जिव्हाळ्याचे निर्माण
होतील. प्रत्येक कार्यकर्ता हा परिपूर्ण होण्यासाठी संघटकांनी, वरिष्ठांनी
कार्यकर्त्यांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्याला योग्य मार्गदर्शन केले तर तो
कार्यकर्ता उत्साहाने नवनवीन जबाबदा-या पेलू शकेल. त्याचप्रमाणे उलटपक्षी प्रत्येक
कार्यकर्त्याने एकमेकांना सहाय्य केले, आपल्यातील त्रुटी, दोष निवारणासाठी प्रयत्न
केले तर नक्कीच वरिष्ठांकडून त्याला पाठीवर शाबासकीची थाप मिळू शकेल. त्यांचा
विश्वास तो संपादन करून घेऊ शकेल व हे संघटनेच्यादृष्टीने खूप मोलाचे आहे. कारण जर
असे विविध क्षेत्रातील परिपूर्ण कार्यकर्ते संघटनेला मिळाले तर संघटनेचा पाया
मजबूत होईल व संघटनेला कळस गाठणे (उद्दिष्ट/ध्येय साध्य करणे) सहज शक्य होईल.
यासाठीच कोणत्याही क्षेत्रात ‘संघटन’ हे
अतिशय महत्त्वाचे आहे. जिथे संघटन असेल
तिथे अतिशय उत्तम कार्य चालू राहील यात काही शंका नाही.
No comments:
Post a Comment