वाहतूक पोलीस जनरल माहिती
वाहतुकीच्या
नियमांचं पालन करणं हे जसं आपलं कर्तव्य आहे तसंच वाहतूक पोलिसांचीही काही कर्तव्य
आहेत. त्यांनाही कायद्याची बंधनं आहेत.
वाहन चालवताना बऱ्याच वेळा आपण वाहतूक
कायद्याचं (Traffic) उल्लंघन करतो. मग वाहतूक पोलीस (Traffic
Police) आपली गाडी
अडवतात आणि आपल्याला दंड (Fine) भरायला सांगतात. आपण तो दंड भरतो आणि पुन्हा आपल्या प्रवासाला
लागतो. मात्र अनेकदा काही वाहतूक पोलीस आपली गाडी थांबवल्यावर आधी गाडाची चावी
काढून घेतात किंवा गाडीच्या टायरमधली हवा काढतात. खरंतर या दोन्ही गोष्टी
कायद्याच्या कक्षेत येत नाहीत. अनेकदा आपण जसं वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करतो
तसच अनेकदा वाहतूक पोलीसही या अशा कृतीतनं नियम मोडताना पाहायला मिळतात. आज आपण
अशाच काही वाहतुकीच्या नियमांची माहिती घेणार आहोत.ज
काय आहेत नियम?
मोटार वाहन कायदा १९३२ अंतर्गत काही
नियम बनवले गेले आहेत. या नियमात असिस्टंट सब इन्स्पेक्टर वाहतुकीचे नियम
मोडल्यानं तुमच्या कडून दंड वसूल करु शकतो. कोणाच्याही गाडीच्या चाव्या काढणं
किंवा टायमधली हवा काढणं हे या कायद्याच्या कक्षेत येत नाही. अशा प्रकारे वाहतूक
पोलिसा त्रास देत असल्यास त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते.
वाहतूक नियम मोडल्यास तुम्हाला दंड
भरावा लागू शकतो. मात्र तो दंड भरताना वाहतूक पोलिसाकडे चालान बुक किंवा इ चालान
मशिन असायला हवं. .याशिवाय पोलीस आपल्या गणवेशात असायला हवा.
तुमच्याकडे नियम भंग केल्यावर खिशात
पैसे नसतील तर तुम्ही चालान घेऊन नंतर न्यायालयात जाऊन दंड भरण्याची मूभा आहे.
अशावेळेस पैसे नसल्यास घाबरुन जाण्याची गरज नाही. मात्र चालान घेतल्यावर तुम्हाला
तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांकडे द्यावं लागतं. तम्ही कोर्टात पैसे भरल्यावर
तुम्हाला ते कोर्टातनं परत मिळू शकतं.
वाहतूक पोलिसाने तुमची गाडी
थांबवल्यावर तुमच्या गाडीची चावी काढून घेणे किंवा टायरमधली हवा काढणे अशा गोष्टी
केल्यास तुम्ही त्याची तक्रार पोलीस स्थानकात जाऊन करु शकता. त्या तक्रारीत तो
पोलीस दोषी आढळल्यास त्यावर कारवाई होऊ शकते. मात्र पोलीसाने गाडी अडवल्यास त्याला
ड्रायव्हिंग लायसन्स दाखवणं बंधनकारक असेल हे नक्की.
No comments:
Post a Comment