आता पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत !
महात्मा फुले जनआरोग्य
योजनेअंतर्गत उपचारासाठी मिळणा-या आर्थिक मदतीची रक्कम पाच लाखांपर्यंत
वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, या योजनेचा लाभ
आता सरसकट सर्वांनाच मिळणार आहे. राज्यातील केशरी व अंत्योदय
शिधापत्रिकाधारकांपुरती मर्यादित असलेली ही योजना आता राज्यातील सर्व
शिधापत्रिकाधारक नागरिकांना लागू झाली आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि केंद्र सरकारच्या पंतप्रधान जन
आरोग्य योजनांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या दोन योजनांच्या एकत्रीकरणामुळे पूर्वी मिळणारे दीड
लाखांचे आरोग्य कवच यापुढे पाच लाखांचे मिळणार आहे. एवढेच नाही, तर उपचारांसाठी रुग्णालयांची संख्याही वाढविण्यात आली आहे.
काय आहे महात्मा फुले
जनआरोग्य योजना?
गरीब आणि कमी उत्पन्न
असलेल्या कुटुंबांना दर्जेदार आणि मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी ही योजना राज्य
सरकारने सुरु केली आहे. दारिद्रयरेषेखालील व दारिद्रयरेषेवरील नागरिकांना पाच
लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत.
केशरी, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनाच मिळायचा लाभ
पूर्वी अन्नपूर्णा योजना, दारिद्रयरेषेखालील पिवळे, अंत्योदय अन्न योजना रेशनकार्ड आणि दारिद्रयरेषेवरील केशरी रेशनकार्ड तसेच
ज्या कुटुंबांचे वार्षिक एक लाख उत्पन्न आहे, अशाच
नागरिकांना या योजनेचा लाभ मिळायचा. आता ती अट काढून टाकण्यात आली आहे.
प्रत्येक कुटुंबावर पाच
लाखांपर्यंत उपचार
महात्मा फुले जनआरोग्य
योजनेला पंतप्रधान जन आरोग्य योजनेची जोड देऊन फक्त पिवळे व केशरी कार्डधारकांनाच
नव्हे, तर सर्व रेशनकार्डधारकांना वैद्यकीय उपचारासाठी
पाच लाखांचे आयोग्यसेवा कवच देण्यात येणार आहे.(संकलित वृत्त)
No comments:
Post a Comment