Wednesday, 14 August 2024

असाही एक व्हाटसप्प ग्रुप

 


ग्राहक चळवळीला मार्गदर्शक " खटाव तालुका ग्राहक संरक्षण समिती " व्हाट्सऍप ग्रुप.                                                                              शब्दांकन - प्रा.नागनाथ स्वामी,सचिव,जागृत ग्राहक राजा संस्था,महाराष्ट्र राज्य.  

 

      विविध संघटनांमध्ये कार्य करत असताना मागील 10 - 15 वर्षांपासून ग्राहक चळवळीशी जवळून संपर्क आला. येथे काम करत असताना हेही ध्यानात आले की ग्राहकांच्याही समस्यांची व्याप्ती खूप मोठी आहे.

                              आदरणीय ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या अथक प्रयत्नांतून शासनाने या विषयीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आणला,तसेच देश पातळीपासून ते अगदी तालुका स्तरावर ग्राहक समस्यांचा निपटारा व्हावा,त्यांना न्याय मिळावा म्हणून व्यवस्था निर्माण केली. ही व्यवस्था निर्माण झाल्यानंतर ग्राहक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. ग्राहकाला योग्य मोबदला, सेवा, न्याय व समाधान मिळवून देणे हे ग्राहक कार्यकर्त्यांचे प्रथम उद्दिष्ट ठरले. त्यातूनच विविध स्तरावर कार्यकर्ते सहभागी होऊन ग्राहक चळवळीत कार्य करू लागले. या कार्यकर्त्यांना  तालुका स्तरावरील " तालुका ग्राहक संरक्षण समिती " मध्ये काम करण्याची संधी उपलब्ध झाली व येथे येणाऱ्या छोट्या मोठया ग्राहक समस्यांना न्याय मिळवून देण्याचे ही समिती एक आशास्थान ठरले. अशीच सातारा जिल्ह्यातील " खटाव तालुका ग्राहक संरक्षण समिती" होय.

    या समितीकडे येणाऱ्या तक्रारींचे वाढते प्रमाण, विविध कार्यालयांमध्ये उपलब्ध अपुरे मनुष्यबळ, वेळ व सोयी सुविधांचा याचा विचार करून या तक्रारींचा निपटारा होऊन ग्राहकांना त्वरित न्याय मिळावा यावर साधक बाधक विचार करून समितीतील जागृत ग्राहक राजाचे प्रा.नागनाथ स्वामी यांनी विद्याधर कुलकर्णी, डॉ.पी.डी.कुलकर्णी, मंदार, विनोद लोहार, प्रा.अजय शेटे व मंदार जोशी व अन्य काही सदस्य यांचेशी चर्चा करून तत्कालीन तहसीलदार किरण जमदाडे यांचेकडे आपला तालुका समितीचा व्हाट्सऍप ग्रुप तयार करण्याची कल्पना मांडली. ती त्यांनी मान्यही केली. परंतु काही कारणांमुळे ती अस्तित्वात येऊ शकली नाही. मात्र नंतरच्या तहसीलदार तथा अध्यक्षा श्रीम. बाई माने हजर झाल्यानंतर २६ डिसेम्बर २०२३ रोजी "राष्ट्रीय ग्राहक दिना" चे औचित्य साधून महाराष्ट्रातील ग्राहक चळवळीला आदर्श ठरावा असा "खटाव तालुका ग्राहक संरक्षण व्हाट्सऍप ग्रुप" अस्तित्वात आला. माझ्या माहिती प्रमाणे अश्या पद्धतीचा हा महाराष्ट्रातील पहिलाच ग्रुप असावा.

     हा ग्रुप योग्य दिशेने व प्रभावीपणे कार्यरत राहावा यासाठी सर्व संमतीने काटेकोर नियमावली करण्यात आली व सर्व सदस्यांनी याचे कटाक्षाने पालन करण्याचे मान्य केले,

ती नियमावली अशी –                                                                                                        *सदरचा ग्रुप हा फक्त आणि फक्त ग्राहक हिताच्या उद्देशाने निर्माण करण्यात आला आहे. यावर फक्त ग्राहक संबधी येणाऱ्या समस्या मांडून त्यावर न्याय मिळावा, विषयाशी संबंधित प्रशासकीय अधिकारी,सेवा देणाऱ्या संस्था यांना त्यावर अभ्यास करून निर्णय देता यावा. ग्राहक, प्रशासन व सेवा संस्था यांचा वेळ वाचून समस्यांची त्वरित सोडवणूक व्हावी ही अपेक्षा आहे.

*कृपया यावर अन्य कोणतेही मेसेज पाठवू नयेत,असे मेसेज आल्यास संबंधित सदस्यास कोणतेही कारण अथवा सवलत न देता लगेच ग्रुप मधून काढून टाकण्यात येईल.

* सदस्यांनी आपल्याकडे आलेल्या ग्राहक अडचणी योग्य नमुन्यात आपल्याकडे घेऊन त्या ग्रुपवर पाठवाव्यात म्हणजे ग्राहक संरक्षण समितीच्या मासिक सहविचार सभेत संबंधित निर्णय देतील.

* मासिक सभेची सूचना ग्रुपवर पाठविण्यात येईल,त्यानुसार आपण सभेस यावे. याशिवाय वेळोवेळी प्रासंगिक सूचना ग्रुपवर देण्यात येईल.

* ग्राहक हिताच्या (उदा. ग्राहक संरक्षण कायदा माहिती,ग्राहक संबधी शासकीय जी आर.  न्यायालयीन निवाडे, तक्रार अर्जाचे नमुने, ग्राहक हिताची माहिती देणाऱ्या बातम्या, तालुका स्तरावरील ग्राहक समस्या इत्यादी )पोस्ट शिवाय या ग्रुप वर इतर कोणतीही पोस्ट टाकू नये.अशी असंबंधीत पोस्ट आल्यास पोस्ट टाकणाऱ्या सदर सदस्यास ग्रुप मधून त्याक्षणी काढून टाकण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

* ग्राहक संघटनांचे पदाधिकारी व इतर सदस्य यांना आपणाकडे येणाऱ्या तक्रारी विशिष्ट नमुन्यात दोन प्रतीत घ्याव्यात. सदरची तक्रार या ग्रुपवर दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी होणाऱ्या मिटिंग पूर्वी किमान ७ दिवस पाठवावी. म्हणजे विषयाशी संबंधित प्रशासकीय अधिकारी  मासिक मिटींगला येतानाच सदर तक्रारींचा परिपूर्ण  अभ्यास करून  येतील, त्यामुळे सर्वांचाच वेळ वाचेल व तक्रारींचे निराकरण करणे सोपे होईल.

* प्रशासकीय अधिकारी यांना ग्राहक संरक्षण समितीच्या मासिक मिटींगला कार्यालय प्रमुखानीच हजर राहणे बंधनकारक आहे. काही अपवादात्मक परिस्थितीत आपल्या कार्यालयातील जबाबदार प्रतिनिधीस पाठवावे.परंतु प्रतिनिधीने मिटिंग मधील तक्रारीचा अहवाल प्रमुखास द्यावा व त्यावर योग्य ती कार्यवाही करून पुढील मिटिंग मध्ये ती स्पष्ट करावी.

*ग्रुपवर आलेल्या तक्रारी पाहून  तक्रारींचा सविस्तर अभ्यास करून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी, मिटिंग मध्ये माहिती द्यावी. काही कायदेशीर अडचण असेल तर किंवा  तक्रारदारांकडून आणखी माहिती व कागदपत्रे हवी असतील तर सदर तक्रारदाराकडून मागवून घ्यावी.

* शक्यतो जास्तीत जास्त तक्रारींचा सत्वर निपटारा होईल हे जाणीवपूर्वक पाहावे.याबाबत ग्राहकाची विनाकारण नाडणूक व त्रास होऊ नये, याची दक्षता घ्यावी.याबाबत ग्राहक संरक्षण समिती अध्यक्षांचा निर्णय अंतिम राहील.

 *मिटींगला गैरहजर अधिकाऱ्यांना प्रथम सूचना दिली जाईल  व पुन्हा असे घडल्यास  नंतर कारवाई केली जाईल.

* सर्वांसाठी अत्यंत महत्वाची सूचना : सर्व संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, प्रशासकीय अधिकारी यांना मासिक मिटिंग दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी होईल. सदर दिवशी सुट्टी आल्यास त्यानंतरच्या कार्यालयीन कामकाजा दिवशी सकाळी ११ वाजता सुरू होईल.

*मिटिंगची नोटीस याच ग्रुपवर पाठवली जाईल. व्यक्तिशः पाठवली जाणार नाही प्रत्येकाने ती पहावी व मिटींगला वेळेवर उपस्थित राहावे.

*मिटिंग वेळेतच होईल, उशिरा येणाऱ्या ग्राहक, संघटना पदाधिकारी यांनी नंतर त्यासंबंधी प्रश्न उपस्थित करून वेळेचा अपव्यव करू नये.

 * सर्वात महत्वाचे म्हणजे मिटिंग मध्ये कोणीही असंवैधनिक भाषेचा वापर करू नये.               आपल्या तालुक्यातील ग्राहक संरक्षण चे कार्य उत्तम व आदर्श ठरावे यासाठी आपणाकडून सहकार्याची अपेक्षा.

वेळोवेळी होऊ घातलेल्या निवडणूक आचार संहितांचा कालावधी वगळता या समितीच्या नियमितपणे बैठका होतात,त्यामध्ये विविध प्रकारच्या अनेक ग्राहक तक्रारींचा निपटारा होऊन तक्रारदार ग्राहकाला न्याय देण्याचा प्रयत्न समिती करत असते. ज्या तक्रारींच्या बाबतीत पुरावे व कागदपत्रांची गरज असते,ती मागवली जातात,पण एक मात्र खरे की,जास्तीत जास्त तक्रारींचा निपटारा जागेवरच केला जातो.सर्व सदस्य सुद्धा त्यासाठी सहकार्य करतात.

      एकूणच अश्या पद्धतीचा ग्रुप निश्चितच ग्राहक चळवळीला मार्गदर्शक ठरेल हा विश्वास वाटतो. 

Sunday, 11 August 2024

कुरिअर घोटाळ्यापासून सावध रहा

 


कुरिअर किंवा पार्सल घोटाळा

 

करणाऱ्यापासून पासून सावध रहा


घोटाळेबाज कुरिअर कंपन्या किंवा सरकारी विभागांचे अधिकारी असल्याचे दाखवतात. आणि सांगतात की तुमचे पार्सल अडकले आहे किंवा बेकायदेशीर वस्तू आहेत म्हणून जप्त केले आहे. ते भीती दाखवतात. त्यानंतर तुम्हाला आधार क्रमांकासारखे वैयक्तिक तपशील शेअर करण्यात आणि आर्थिक व्यवहार करण्याची फसवणूक केली जाते.

या बहाण्याने तुम्हाला पैसे हस्तांतरित करण्यास सांगतात, ते परत करण्यायोग्य असल्याचे आश्वासन देतात. एकदा तुम्ही पैसे पाठवल्यानंतर, ते सर्व संपर्क तोडून टाकतात  

आणि तुमच्याकडे कोणताही मार्ग ऊरत नाही.

अशावेळी स्वतःचे संरक्षण कसे करावे:

• अधिकृत संपर्क तपशील वापरून कोणत्याही अनपेक्षित वितरण कॉल्स किंवा संदेशांची थेट कुरिअर कंपनीकडे पडताळणी करा.

• कुरिअर कंपन्यांकडून दावा करणाऱ्या ईमेल किंवा मेसेजमधील लिंक पासून सावध रहा, कारण ते फसवे असू शकतात.

मेसेजमधील स्पेलिंग किंवा व्याकरणाच्या चुकांकडे लक्ष द्या, कारण त्या घोटाळ्याची चिन्हे असू शकतात.

वैयक्तिक तपशील म्हणजे तुमचा आधार क्रमांक, बँक खाते माहिती किंवा इतर कोणताही संवेदनशील डेटा, विशेषत: फोनवर किंवा अपरिचित वेबसाइट किंवा लिंकद्वारे शेअर करू नका.

तुम्हाला अपेक्षित नसलेल्या डिलिव्हरीसाठी कधीही कोणतेही शुल्क भरू नका किंवा upi  तपशील देऊ नका.

 निर्णय घेण्याची घाई करू नका. घोटाळे करणारे अनेकदा निकडीची खोटी भावना निर्माण करतात.

•112 किंवा 1930 वर कॉल करून ताबडतोब संशयास्पद क्रियाकलापाची तक्रार करा किंवा जवळच्या सायबर क्राइम पोलिस स्टेशनला भेट द्या.

Saturday, 10 August 2024

सावधान : न दिसणारा चोर

 


ग्राहक प्रबोधन

 

  • तुमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर ‘तुम्ही फक्त आमचा युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्हाला घरबसल्या पैसे मिळतील.’ असा मेसेज आला असेल तर सावधान. कारण असेच मेसेज करून,तुमच्या बँक खात्यांमध्ये सुरुवातीला काही पैसे टाकून नंतर खात्यातील सर्वच पैसे काढून नंतर खात्यातील सर्वच पैसे काढून घेणारी सायबर भामटे  नवा पॅटर्न राबवत आहेत.
  •  अनेकजणांना असाच लाईक, सबस्क्राईबचा मेसेज येत असून ते संबंधित भामट्यांच्या अमिषाला बळी पडत आहेत.दिवसाला अवघे तीन युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून त्यातून दोन हजार ते १० हजार रुपये दिवसाला कमविण्याचे आमिष हे सायबर भामटे दाखवित आहेत. काम वेळेत पूर्ण केले म्हणून रिवॉर्डदेखील देत आहेत. 
  • एका महिलेच्या बँक खात्यामध्ये हे काम करत आहे म्हणून तिच्या बँक खात्यात सलग आठ दिवसांत दोन हजार रुपये जमा केले. त्यानंतर महिलेला एक लिंक पाठवून त्यावर आमचे खाते ओपन करण्यास सांगून त्यावर तिचे पैसे जमा होतील असे सांगण्यात आले. महिलेच्या त्या खात्यावर सुरुवातीला काही पैसे जमा झाले. मात्र, महिलेने ज्या लिंकद्वारे ही माहिती भरली त्याद्वारे महिलेच्या बँकेचे ऑनलाईन पासवर्ड तसेच बँक खाते हँडल करण्याचा अॅक्सेस मिळाला. त्याद्वारे चोरट्याने बँक खात्यातील सर्व पैसे काढून घेतले.
  • हा फ्रॉडचा प्रकार आहे. एकानंतर एक काम सांगून त्यामध्ये संबंधित व्यक्तीला गुंतवणूक करण्यास सांगून लूट केली जाते. त्यामुळे व्हॉट्सअॅप अथवा टेलिग्रामद्वारे मिळणा-या अशा स्वरूपाच्या कामांवर, मेसेजवर विश्वास ठेवू नका. अनोळखी व्यक्तींकडून संपर्क साधला जात असेल तर वेळीच सावध व्हा.
  • अशी घ्या काळजी .....
  •     अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजला रिप्लाय करू नका.
  • •    घरबसल्या फक्त लाईक, सबस्क्राईब करून पैसे मिळत नसतात त्यामुळे अशा मेसेजकडे दुर्लक्ष करा.
  •     अनोळखी नंबर किंवा एसएमएस करणा-याला बँक डिटेल्स देऊ नका.
  • •    कमी वेळेत जस्त पैशाचे आमिष दाखवत असतील तर प्रश्न उपस्थित करा.
  •     माहिती भरण्यासाठी पाठवलेल्या लिंक सुरक्षित आहे का याचा विचार करून पुढचे पाऊल उचला.
  •     आवश्यकता नसताना पाठवलेली लिंक क्लिक करू नका. त्यामुळे तुमच्या अकाऊंटची माहिती सायबर भामट्यांबरोबर शेअर होऊ शकते. गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडू नका.

Thursday, 24 August 2023

रोज नवीन माहिती : भारतातील 11 महत्वाचे कामगार कायदे

 


भारतातील
11 महत्वाचे कामगार कायदे




1. किमान वेतन कायदा

नावाप्रमाणेच, हा कायदा तुम्हाला मिळणारे किमान वेतन ठरवतो. तुम्ही कुशल किंवा अकुशल कर्मचारी असाल आणि तुमची स्थिती यानुसार किमान वेतन बदलते. किमान, तुम्ही ज्या श्रेणीशी संबंधित आहात त्यासाठी तुमच्या राज्यात लागू असलेल्या किमान वेतनाबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे.

2. मातृत्व लाभ (सुधारणा) कायदा 

3. 2017 मध्ये, महिलांसाठी उपलब्ध सशुल्क प्रसूती रजा 12 आठवड्यांवरून 26 आठवडे करण्यात आली. जर एखाद्या महिलेने गेल्या 12 महिन्यांत 80 दिवसांपेक्षा जास्त काळ एखाद्या संस्थेत काम केले असेल, तर ती अशा सशुल्क रजेचा लाभ घेण्यास पात्र आहे. तुम्ही 3 महिन्यांपेक्षा कमी वयाचे मूल दत्तक घेतले असल्यास, तुम्ही दत्तक घेतल्याच्या तारखेपासून 12 आठवड्यांच्या सशुल्क प्रसूती रजेसाठी देखील पात्र आहात. एक कमिशनिंग मदर, म्हणजेच जैविक माता जी तिच्या भ्रूणाचा वापर दुसर्‍या स्त्रीमध्ये (सरोगेट मदर) करण्यासाठी वापर करते, ती देखील मुलाच्या जन्माच्या दिवसापासून 12 आठवड्यांची प्रसूती रजा घेऊ शकते.

मालकाने किंवा कंपनीने परस्पर सहमती दर्शवल्यास 26 आठवड्यांचा रजेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर महिला घरूनही काम करू शकतात. या कायद्यांतर्गत. 50 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असलेल्या आस्थापनांसाठी देखील क्रेच सुविधा अनिवार्य आहे आणि महिलांना दिवसातून 4 वेळा क्रेचला भेट देण्याची परवानगी आहे.

3. वेतन देय कायदा 

4. तुमच्या मालकाने किंवा कंपनीने तुमच्या पेमेंटला दर महिन्याला उशीर केल्यास, हा कायदा तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट, 1936 नुसार, तुमच्या मालकाने तुम्हाला तुमचा पगार दर महिन्याच्या 7 तारखेपर्यंत अदा करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. हा कायदा तुमच्या पगारातून मिळणाऱ्या कपातीचेही नियमन करतो.

4. समान मोबदला कायदा 

जर तुम्ही एक महिला असाल आणि तुम्ही तुमच्या पुरुष सहकाऱ्यांपेक्षा कमी कमावत असाल आणि त्याच पदावर काम करत असाल आणि तुम्हाला समान अनुभव असेल, तर तुम्ही तुमच्या मालकावर चांगला दावा करू शकता. समान मोबदला कायदा, 1976 सांगतो की तुम्ही दोन कर्मचार्‍यांमध्ये त्यांचे लिंग, रंग किंवा वंश यावर आधारित फरक करू शकत नाही.

5. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ संबंधी कायदा

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण) कायदा 2013 मध्ये लागू करण्यात आला. या कायद्यानुसार, प्रत्येक नियोक्त्याने अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे आवश्यक आहे ज्याने तक्रारीच्या 90 दिवसांच्या आत तक्रारींची चौकशी पूर्ण करणे आवश्यक आहे. . या कायद्यानुसार लैंगिक छळाचा समावेश होतो –

(i) शारीरिक संपर्क आणि लाभ घेणे (ii) लैंगिक अनुकूलतेसाठी मागणी किंवा विनंती (iii) लैंगिक टिप्पणी करणे (iv) पोर्नोग्राफी दाखवणे (v) लैंगिक स्वभावाचे इतर कोणतेही अनिष्ट शारीरिक, शाब्दिक किंवा गैर-मौखिक आचरण हा कायदा केवळ कामाच्या ठिकाणापुरता मर्यादित नसून शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थी तसेच रुग्णालयातील रुग्णांचाही यात समावेश आहे. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणालाही कोणत्याही प्रकारच्या लैंगिक छळाचा सामना करावा लागत असल्यास, कृपया बोला आणि त्याची तक्रार करा.

6.भविष्य निर्वाह निधी कायदा

या कायद्याचा उद्देश कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीची बचत करणे हा आहे. पूर्वी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये योगदान दिलेली रक्कम आणि त्यावर मिळणारे व्याज करमुक्त असायचे. पण आतापासून, तुमचे योगदान एका वर्षात ₹2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास, जास्तीच्या रकमेवर मिळणारे व्याज करपात्र असेल. तुम्हाला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) देखील मिळतो ज्यामुळे जुन्या नियोक्त्याकडून नवीन नियोक्त्याकडे EPF चे हस्तांतरण त्रासमुक्त होते.

7. कर्मचारी राज्य विमा योजना 

ही भारत सरकारद्वारे प्रदान केलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे, जी नोकरीवर असताना झालेल्या दुखापती, आजारपण किंवा प्रसूतीच्या बाबतीत कर्मचाऱ्यांचे संरक्षण करते. कर्मचारी राज्य विमा योजना ही दोन प्रकारच्या विमा योजनांचे संयोजन म्हणून समजली जाऊ शकते, ती म्हणजे तुमचा आणि तुमच्या कुटुंबासाठी वैद्यकीय विमा आणि तुमच्यासाठी अपघाती विमा. हे दुकाने, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये लागू आहे परंतु उत्पादन, सिनेमा, वृत्तपत्र इत्यादी आस्थापनांना लागू होत नाही.

8. बोनस कायदा 

बोनस कायदा, 1965 नुसार, कंपन्यांना वैधानिक बोनस देणे बंधनकारक आहे. बोनसची किमान मर्यादा 8.33% आहे, म्हणजेच तुमच्या कंपनीने तुम्हाला तुमच्या वेतनाच्या 8.33% इतका किमान बोनस देणे आवश्यक आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी एका वर्षात 30 दिवसांपेक्षा जास्त काळ काम केले आहे आणि त्यांना दरमहा ₹21,000 पर्यंत पगार किंवा वेतन मिळते त्यांच्यासाठी हे लागू आहे.

9. ग्रॅच्युइटी कायदा

जर तुम्ही कंपनीत पाच वर्षांहून अधिक काळ काम केले असेल आणि सोडण्याचा निर्णय घेतला असेल, तर तुम्हाला त्या कंपनीत काम केलेल्या प्रत्येक वर्षासाठी 15 दिवसांची ग्रॅच्युइटी मिळण्याचा अधिकार आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या कंपनीत 10 वर्षे काम केले असेल, तर तुम्हाला ग्रॅच्युइटी म्हणून तुम्ही काढलेल्या शेवटच्या पगारानुसार 150 दिवसांचा पगार मिळेल.

10 दुकान आणि आस्थापना कायदा 

आजारी रजा, अनौपचारिक रजा, तुम्हाला एका वर्षात मिळणारी सुट्टी यासारख्या विविध प्रकारची सुट्ट्या या कायद्या अंतर्गत समाविष्ट केली गेली आहेत. दुकान आणि आस्थापना कायदा राज्यानुसार भिन्न आहे. तुम्ही तुमच्या राज्याला लागू होणारे नियम तपासावे आणि तुमचा मालक तुम्हाला त्यानुसार सुट्ट्या देत आहे की नाही हे ठरवावे.

11 औद्योगिक विवाद कायदा

जेव्हा तुम्ही तुमची नोकरी सोडता किंवा तुम्हाला नोकरीतून काढून टाकेले जाते तेव्हा ही कृती उपयुक्त ठरते. हे कर्मचार्‍याच्या समाप्तीच्या वेळी पाळल्या जाणार्‍या प्रक्रियेचे नियमन करते. त्यामध्ये संपुष्टात येण्याच्या वेळी प्रदान करण्यात येणारी भरपाई देखील समाविष्ट आहे. हे भारतात लागू होणारे काही कामगार कायदे आणि त्यांच्या काही तरतुदी आहेत ज्यांची प्रत्येक व्यक्तीला जाणीव असायला हवी. ते कर्मचार्‍यांना सक्षम बनवतात आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करतात याची खात्री करतात.   (संकलित वृत्त )

Tuesday, 15 August 2023

रोज नवीन माहिती

 


ग्रामपंचायतच्या 20 समित्या

 आपल्या ग्रामपंचायत मध्ये २० समित्या असतात त्या कामे करतात का या समितीचे परिपूर्ण माहिती हवी असल्यास तसेच काही सामित्या मध्ये कामचुकारपणा झालेला दिसून आल्यास माहिती चा अर्ज करून करून परिपूर्ण माहिती मागवा. आपल्या ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार होत असेल तर CEO यांच्या कडे तक्रार करा. किंवा लोकयुक्त आणि उपलोकायुक्त यांच्या कडे तक्रारी करा. ही माहिती जनहितार्थ आहे व जनतेला जागरूक करण्याकरिता आहे.

ग्राम पंचायत स्थरावरील 20 समित्या

१)      महात्मा गांधी तंटा मुक्त गाव समिती.: ग्रामीण भागात तंटे निर्माण होऊ, नयेत गावात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राबविले जातत. या महात्मा गांधी तंटा मुक्त गाव समिती चे अध्यक्ष पद हे सरपंच असतो. तर सचिव हा पोलीस पाटील असतो. हे पद गावाचे तंटे मिटवण्यासाठी आहे. पद दिले म्हणून पुढारीपणा करू नये अन्यथा कार्यवाही देखील होते. ग्रामीण भागात स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करावे. या इतर दुरुपयोग करू नये.

२)      संयुक्त वन व्यवस्थापन समिती.: गावाच्या  ग्रामपंचायत मध्ये  पहिल्या ग्रामसभेत दहा जणांची समिती निवडून करून  त्यांच्या नावाच्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती तयार केली जाते. तसेच ह्या  यादीसह ठराव करावा लागतो. या समितीला 'वन हक्क समिती' म्हणून ओळखले जाते. या वन समितीत किमान १/३ सदस्य अनुसूचित जमातीचे व किमान १/३ महिला सदस्य असायलाच हवे. ग्रामपंचायत च्या वन कायदा माहिती असणे आवशक आहे. या समिती चे अध्यक्ष पद हे सरपंच असतो, तर सचिव हा ग्रामसेवक असतो.

3) शालेय व्यवस्थापन समिती - या समिती चे अध्यक्ष पद पालक असतो, तर सचिव हा  मुख्यध्यापक असतो. या समितीत  किमान १२ ते १६ लोकांची असते. (सदस्य सचिव वगळून),यापैकी किमान ७५ टक्के सदस्य बालकांचे आईवडील / पालक यामधून असतील. पालक हा  सदस्यांची निवड करतो तर पालक सभेतून करण्यात येतात.

४ ) ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा स्वच्छता समिती. - शासन निर्णय नुसार गावातील पाणीपुरवठा योजनांच्या दैनंदिन देखभाल व दुरुस्थीचे कामे पाहण्यासाठी व पाणी गुणवत्ता नियंत्रणासाठी ग्राम्स्थारावर गरम पाणीपुरवठा व परिसर स्वच्छता गठीत करून गावाचे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत बालमृत्य दर, माता मृत्य दर व जनन दर कमी करणे. लसीकरण कुपोषण व इतर आरोग्य विषयक कार्यक्रम घेणे. या समिती चे अध्यक्ष पद सरपंच असतो, तर सचिव हा आशा सेविका असते.

५ ) बाल विवाह प्रतिबंधक कायदा समिती.: देशानुसार कायदे हे बाल विवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार महत्वाचा आणि मुलींना संवरक्षण देणारा का कायदा आहे. जास्त करून ग्रामीण क्षेत्रात बाल विवाह केले जातात आणि या साठीच बाल विवाह प्रतिबंधक कायदा, या समिती चे अध्यक्ष पद सरपंच असतो, तर सचिव हा ग्रामसेवक असतो. या कायद्यानुसार प्रत्येक गावात अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

६) आपत्ती व्यवस्थापन समिती.:आपत्ती व्यवस्थापन म्हणजे, काय ? सविस्तर माहिती अशी आहे.की, आपत्तीच्या सुनियोजित प्रतिकारासाठी योग्य तयारी तात्काळ प्रतिसाद आणि आपत्तीनंतर उद्भवणारी परिस्थिति पुर्वपदावर आणण्याची योजना होय. अचानक किंवा मोठी दुर्दैवी घटना आपत्ती ची घटना म्हणून परिभाषित केली जाऊ शकते. या समितीत मदतीने शाळा आपत्ती व्यवस्थापन आराखडा करणे आवश्यक आहे. या समिती चे अध्यक्ष पद सरपंच असतो, तर सचिव हा ग्रामसेवक असतो.

७) कर आकारणी समिती : ग्रामपंचायत अधिनियम १९५८ आणि त्यातील कायदा कलम १२४ व त्याअंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत कर आकारणी कशी केली जाते? व फी (शुल्क) नियम १९६० यामधील तरतुदीनुसार गावाच्या सीमेतील इमारती (मग त्या कृषी आकारणीस अधिन असोत किंवा नसोत) व जमिनी यावर कर आकारण्याचा अधिकार ग्रामपंचायतीस देण्यात आलेला आहे. या समितीचे अध्यक्ष पद सरपंच असतो, तर सचिव हा ग्रामसेवक असतो.

८) जन्म मृत्यू नोंदणी समिती.: ग्रामीण भागातील नागरिकांनी जन्म-मृत्युची घटना घडल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत ठिकाणी जन्म-मृत्युची माहिती घटना घडल्यापासून २१ दिवसांच्या आत दिली पाहिजे. वरील मुदतीच्या आत जन्म-मृत्युची नोंद व माहिती वेळेवर देणे कायद्याने सक्तीचे आहे. या समिती चे अध्यक्ष पद ग्रामसेवक असतो, तर सचिव ही आशा असते.

९) सामाजिक लेखापरीक्षण समिती : स्थानिक सरकारांना पुरविलेल्या निधी आणि कार्यांमध्ये लक्षणीय बदल झाल्यामुळे सोशल ऑडिटची मागणी वाढली आहे. भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार मनरेगासारख्या प्रमुख कार्यक्रमांमध्ये सोशल ऑडिटला प्रोत्साहन देत आहे. राज्य सरकारांनी, अशासकीय संस्थांच्या भागीदारीत आणि ग्रामसभांच्या माध्यमातून, त्यांच्या देखरेख प्रणालीचा एक भाग म्हणून सामाजिक लेखापरीक्षण समाविष्ट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या समिती चे अध्यक्ष पद सरपंच असतो, तर सचिव हा ग्रामसेवक असतो.

१०) ग्राम बाल संरक्षण समिती.:बालकांचे हक्क आणि संरक्षण या विषयांवर लक्ष ठेवण्यासाठी, बालहक्कांवर परिणाम घडवून आणण्यासाठी आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी सर्व गावांमध्ये ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात येईल. महाराष्ट्र सरकारच्या समाज कल्याण, महिला आणि बाल विकास विभागाकडून सर्व जिल्ह्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या समिती चे अध्यक्ष पद सरपंच असतो, तर सचिव हा ग्रामसेवक असतो.

११)लाभार्थी स्तर उपसमिती.:गावातील सर्व महिला 100% साक्षर आहेत. जर होय असेल तर बक्षीस मिळविण्यासाठी तयार रहा. नसेल तर थांबा. साक्षर भारत मिशन 2012 अंतर्गत, लवकरच गावोगावी सार्वजनिक शिक्षण समित्या स्थापन करून साक्षरतेच्या दिशेने शासनाचा कसरत सुरू झाली. साक्षरता, पर्यायी शिक्षण संचालकांच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनांना पत्र पाठविण्यात आले आहे. ब्लॉक व गावपातळीवर सार्वजनिक शिक्षण समित्या स्थापन करून शिक्षण क्षेत्रात विशेष काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या समिती चे अध्यक्ष पद सरपंच असतो, तर सचिव हा ग्रामसेवक असतो.

१२) संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान समिती.: महाराष्ट्र शासन दरवर्षी संत गाडगे यांच्या नावाने स्वच्छता पुरस्कार देते. महाराष्ट्र सरकारनेही 2000-01 मध्ये संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू केले. या अभियानात स्वच्छ गावांचा गौरव करण्यात आला आहे. अमरावती विद्यापीठाचेही नाव त्यांच्या नावावर आहे. भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटही जारी केले होते. यासोबतच भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ स्वच्छता आणि पाणी यासाठी राष्ट्रीय पुरस्कारही सुरू केला आहे. या समिती चे अध्यक्ष पद सरपंच असतो, तर सचिव हा ग्रामसेवक असतो.

१३) ग्राम दक्षता समिती (स्वस्त धान्य दुकान).: सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरील देखरेखीत जनतेचा सहभाग राहण्याच्या दृष्टीने सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरीत करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंच्या वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी राज्य शासनाने शासन निर्णय दि.23 जानेवारी, 2008 अन्वये राज्यात ग्राम, तालुका, नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हास्तरावर दक्षता समित्या गठीत केल्या आहेत. तसेच, मा.मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सल्लागार समितीही गठीत करण्यात आली आहे. या समिती चे अध्यक्ष पद सरपंच असतो, तर सचिव हा तलाठी असतो. ग्राम स्तरावरील दक्षता समितीचे अध्यक्ष हे त्या गावचे सरपंच असतात. ग्राम पातळीवरील दक्षता समितीमध्ये शासकीय आणि अशासकीय मिळून एकूण १३ सदस्य असतात. तालुका स्तरावरील दक्षता समितीचे अध्यक्ष हे त्या तालुक्याच्या जास्तीत जास्त भागाचे प्रतिनिधीत्व करणारे विधान सभा सदस्य असतात. तालुका स्तरावरील दक्षता समितीमध्ये शासकीय आणि अशासकीय मिळून एकूण १७ सदस्य असतात.जिल्हा स्तरावरील दक्षता समितीचे अध्यक्ष हे त्या जिल्हयाचे पालकमंत्री असतात. जिल्हा स्तरावरील दक्षता समितीमध्ये शासकीय आणि अशासकीय मिळून एकूण २१ सदस्य असतात.

१४) जैवीक विविधता समिती.: पर्यावरणाच्या रक्षणाच्या सततच्या चिंतेमध्ये सरकार आता जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत जागरूक झाले आहे. त्यासाठी पंचायत ते जिल्हास्तरापर्यंत समित्या स्थापन करण्यात येत आहेत. जैवविविधतेशी निगडीत गोष्टी सुरक्षित आणि संरक्षित करण्यासोबतच ही समिती सरकारला जनतेच्या सूचनाही कळवणार आहे. यासाठी लोकांची विविधता नोंदवही ठेवली जाणार आहे. ज्यामध्येj ग्रामपंचायतीमधील पंचायत स्तरावरील, ब्लॉक स्तरावरील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील जिल्हास्तरीय समित्यांच्या बैठकीत प्रतिनिधी व सदस्य उपस्थित राहणार आहेत. या समिती चे अध्यक्ष पद सरपंच असतो, तर सचिव हा ग्रामसेवक असतो.

१५) GPDP ग्राम साधन गट समिती.: 15 व्या वित्त आयोगांतर्गत, भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाकडून पंचायतींच्या विकासासाठी थेट जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना 5:20:75 च्या प्रमाणात निधी हस्तांतरित केला जात आहे. तळागाळातील नागरिकांना मदत करणे. च्या मूलभूत किमान गरजा पूर्ण करणे.या समिती चे अध्यक्ष पद सरपंच असतो, तर सचिव हा ग्रामसेवक असतो.

१६) स्वच्छ भारत मिशन निगराणी समिती.: भारताच्या पंतप्रधानांनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी सार्वत्रिक स्वच्छता साध्य करण्यासाठी आणि स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी स्वच्छ भारत मिशन सुरू केले.महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत स्वतःला "खुल्या शौचास मुक्त" (ODF) घोषित केले. उघड्यावर शौच न करण्याची प्रथा शाश्वत आहे याची खात्री करण्यासाठी. या समिती चे अध्यक्ष पद सरपंच असतो, तर सचिव हा ग्रामसेवक असतो.

१७) पाणंद रस्ता समिती.: शेत पाणंद रस्ते हे प्रामुख्याने शेतीमधील कामाकरीता आवश्यक साधनांची ने-आण करण्याकरीता उपयोगात येतात. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी आंतरमशागत, कापणी, मळणी यासारखी कामे यंत्रामार्फत करण्यात येतात. अशा यंत्र सामग्रीची वाहतूक करण्याकरिता पावसाळ्यातही शेत / पाणंद रस्ते सुयोग्य असणे काळाची गरज आहे.या समिती चे अध्यक्ष पद सरपंच असतो, तर सचिव हा ग्रामसेवक असतो.

१८) पाणलोट विकास समिती.: पाणलोट विकास योजना अंतर्गत आडवी पेरणी , मिश्र पीक पद्धती करणे मृतसरी काढणे, रुंद सरी – वरंबा पद्धतीने पेरणी करणे बांधबंदिस्ती, गॅबियन बंधारे इ. उपाय योजनांवर भर देण्यात येणार आहेत. पावसाचे व्यवस्थापन पाण्याची साठवण , पाण्याचा योग्य वापर व साठवणूक, पाण्याचे पुनर्भरण पाणलोट समिती हे कार्य करून घेणार आहेत.या समिती चे अध्यक्ष पद सरपंच असतो, तर सचिव हा ग्रामसेवक असतो. 

१९) मोकाट जनावरे देखरेख समिती.: जनावरे दिवस-रात्र रस्त्यावर मोकाट फिरत असल्यामुळे शहरातील वाहतुकीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. यासाठी पालघर पोलिसांनी या गुरांच्या मालकांना अनेकवेळी नोटीसा दिल्या आहेत. शिवाय चार-पाच वेळा पोलिस स्वतः मालकापर्यंत जाऊन समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र हे मालक कोणालाही न जुमानता अजूनही दिवस-रात्र गुरे मोकाट सोडत आहेत.या समिती चे अध्यक्ष पद सरपंच असतो, तर सचिव हा ग्रामसेवक असतो.

२०) अन्नधान्य वितरण समिती.: पुरवठा विभागाचा इतिहास असा आहे की, दुस-या महायुद्धाच्या काळात लोकांच्या जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी अनेक अडचणी होत्या आणि अशा लोकांना उपासमारीला सामोरे जावे लागले. तत्कालीन ब्रिटिश सरकारने लोकांना आवश्यक वस्तू वितरित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सरकारने भारत सरकारच्या संरक्षण कायद्यांतर्गत आवश्यक कमोडिटी अध्यादेश १९४६ अस्तित्वात आला. अध्यादेशानुसार सरकारला जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन, पुरवठा आणि वितरण वितरीत करण्याचे अधिकार देण्यात आले.या समिती चे अध्यक्ष पद तलाठी  असतो, तर सचिव हा ग्रामसेवक असतो.


असाही एक व्हाटसप्प ग्रुप

  ग्राहक चळवळीला मार्गदर्शक " खटाव तालुका ग्राहक संरक्षण समिती " व्हाट्सऍप ग्रुप.                                              ...